Ad will apear here
Next
लोटस इंग्लिश स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर


सोलापूर :
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन या संस्थेतर्फे संचालित लोटस इंग्लिश स्कूल (कासेगाव, ता. पंढरपूर) येथे तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाचे (कनिष्ठ स्तर) न्यायाधीश ए. पी. कराड उपस्थित होते. या वेळी लोटस इंग्लिश स्कूलचे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी न्यायमूर्ती कराड यांचे स्वागत केले. पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. बी. व्ही. मुळे, उपाध्यक्ष ॲड. विलास शेळके व ॲड. संदीप सुरवसे यांचेदेखील स्वागत करण्यात आले. 

प्रमुख वक्ते विलास शेळके म्हणाले, ‘मुलांच्या किंवा मुलींच्या संरक्षणासाठी २२ मे २०१२ रोजी संसदेमध्ये कायदा पास झाला आणि याची अंमलबजावणी १२ नोव्हेंबर २०१२पासून झाली. प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स असा कायदा आहे. ज्या मुलीवर किंवा मुलावर अन्याय झाला आहे, अशा पीडित मुलांना व मुलींना न्याय देण्यासाठी विशेष प्रोटेक्शन ऑफिसर नेमून तो गुन्ह्याची नोंद करून घेतो आणि गुन्हेगार व्यक्तीपासून पीडित व्यक्तीला संरक्षण देतो.’ ‘गुड टच बॅड टच’ची माहितीही त्यांनी दिली. 

पुढे अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती कराड म्हणाले, ‘उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे समाजातील एक घटक म्हणून कोर्टातच फक्त काम न करता समाजात कायद्याची माहिती देणे गरजेचे आहे. तसेच बालमजुरी किंवा बाललैंगिक अत्याचार, शिक्षणापासून वंचित असणारी मुले, भीक मागायला लावणे, अनाथ मुलांना त्रास देणे यापैकी कोणत्याही प्रकारचे अत्याचार होत असतील, तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनपासून थेट कोर्टापर्यंत करता येते. शिक्षणाने क्रांती आणि उत्क्रांती झाली आहे. शिक्षणामुळे माणूस मोठा होतो. त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे.’ 

प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण म्हणाल्या, ‘आम्ही शाळेत सायकॉलॉजिकल कौन्सेलरमार्फत मुलींना गुड टच आणि बॅड टच यासंबंधी माहिती देतो. तसेच समाजात असे घृणास्पद प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही शाळेत मूल्यशिक्षणामार्फत चांगले काय वाईट काय याची माहिती सांगतो. कायदेविषयक कोणताही कार्यक्रम राबवायचा असेल तर शाळा नेहमी तयार आहे.’

कार्यक्रमाला शिक्षक संपत लवटे, पटेल नामदे, ढोणे, गाढवे, निकम, वायदंडे, अस्मा शेख, साळुंखे, दिवसे, दीक्षित, कोकणे, घोलप आदी उपस्थित होते. ॲड. संदीप सुरवसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZGBCB
Similar Posts
लोटस इंग्लिश स्कूलला देशी-विदेशी अधिकाऱ्यांची भेट सोलापूर : कासेगाव (ता. पंढरपूर) येथील ‘श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन’द्वारे संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये देशी-विदेशी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. त्यात जपानमधील टोकियो येथील टोपान प्रिंटिंग कंपनीचे डायरेक्टर कजिरो ओकी, अनुराग गुप्ता, नवी दिल्लीच्या एआरजी कन्सल्टिंग
कासेगावात सौर पंपाने शेतीला पाणी सोलापूर : विजेअभावी शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी आता सौरऊर्जा वापरण्याबाबत सजग होऊ लागले आहेत. जिल्ह्यात प्रथमच कासेगाव (पंढरपूर) येथील आर्वे बंधूंनी आपल्या शेतात सौर ऊर्जेवर चालणारा विद्युत पंप बसवला आहे.
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ सोलापूर : ‘शासनाच्या सूचनेनुसारच सोलापूर महापालिकेच्या सर्व गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, पाणीपुरवठा विभागाकडून नळ जोडणीच्या ठिकाणी लवकरच स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language